Ad will apear here
Next
गोविंदगडावर वैभवशाली मशाल महोत्सव
छायाचित्रे : धीरज वाटेकर

चिपळूण :
शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा मशाल महोत्सव १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक गोविंदगडावर साजरा झाला. किल्ले प्रतापगडानंतर कोकणात होणारा हा पहिलाच मशाल महोत्सव आहे. या निमित्ताने संपूर्ण गडाभोवती मशाली लावण्यात आल्या. गोवळकोट गावातून काढण्यात आलेली शिवछत्रपतींची पालखी मिरवणूक किल्ल्यात पोहोचल्यावर दीपप्रज्ज्वलन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. गडावर मशाली पेटविण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. या उत्सवाचे हे सहावे वर्ष होते.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZWTCG
Similar Posts
देशाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शास्त्रीजींनी केला रत्नागिरी : ‘स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक दुसरे पंतप्रधान लालबहादूरशास्त्री यांनी केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची लष्करी ठाणी ताब्यात घेण्याचे कार्य त्यांच्या आदेशामुळे १९६५ साली साध्य झाले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले
राष्ट्रउभारणीसाठी वक्तृत्व आणि कर्तृत्वातून नेतृत्व घडवायला हवे रत्नागिरी : ‘समाजातील चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आणि त्या बाजूने बोलण्यासाठी धाडस आणि चांगल्या वक्तृत्वाची आवश्यकता असते. त्यातून कर्तृत्व घडत जाते आणि त्यातूनच टप्प्याटप्प्याने नेतृत्व घडते, जे राष्ट्रउभारणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या कार्यामध्ये सध्या प्राध्यापकांचा सहभाग फारसा दिसत नाही
लालबहादूरशास्त्री म्हणजे राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम रत्नागिरी : ‘देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूरशास्त्री म्हणजे राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम होते. शेती आणि संरक्षण या देशाच्या अत्यावश्यक बाबींकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिल्यामुळे या दोन्ही बाबतींमध्ये देश नेहमीच आघाडीवर राहिला,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले
इंदिराजींच्या कणखर भूमिकेमुळे १९७१च्या युद्धात भारताचा विजय रत्नागिरी : ‘अमेरिका, इंग्लंड अशा बलाढ्य देशांचा दबाव असूनही, कणखर राहून त्याकडे साफ दुर्लक्ष करून १९७१ साली झालेल्या युद्धात इंदिरा गांधी यांनी अभूतपूर्व मुत्सद्देगिरी केली. त्यांच्या कणखरतेमुळेच पाकिस्तानचे विभाजन करण्यात यश मिळाले. त्याआधीच्या सरकारांनी केलेल्या चुका त्यांनी केल्या नाहीत,’ असे प्रतिपादन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language